शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

देशात गतवर्षी ७ टक्के बलात्कार अन् १0 टक्के गँगरेप घटले!

By admin | Updated: September 3, 2016 02:59 IST

बलात्काराच्या घटनांचे दररोज मोठ मोठे मथळे वृत्तपत्रात दिसतात. तथापि सरकारी आकडेवारीचा शोध घेतला तर वेगळेच चित्र समोर येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गुन्हेगारी

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

बलात्काराच्या घटनांचे दररोज मोठ मोठे मथळे वृत्तपत्रात दिसतात. तथापि सरकारी आकडेवारीचा शोध घेतला तर वेगळेच चित्र समोर येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या गुन्हेगारी प्रकरणांची देशव्यापी आकडेवारी गोळा करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार, वर्षभरात बलात्काराच्या संख्येत देशात ७ टक्क्यांची तर गँगरेप प्रकरणात १0 टक्क्यांची घट झाली आहे. ३६ पैकी १५ राज्यात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण बऱ्यापैकी घटले आहे. महाराष्ट्रात मात्र २0१५ साली दुर्देवाने बलात्कारांची संख्या वाढली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २0१४ व २0१५ अशा दोन वर्षांच्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या आकडेवारीचा तक्ता अहवालात सादर केला आहे. २0१४ साली देशात ३७ हजार ४१३ बलात्कार झाले तर २0१५ साली बलात्काराची संख्या ३४ हजार ६५१ पर्यंत खाली आली. २0१५ सालीही देशात बलात्काराच्या घटनांमधे मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे मात्र २0१४ च्या तुलनेत तिथे बलात्काराच्या संख्येत १३.४९ टक्क्यांची घट झाली आहे. देशात बलात्कारांमधे सर्वाधिक घट सिक्कीम ८९ टक्के, तामिळनाडू ६२ टक्के, कर्नाटक ५५.५ टक्के, मिझोरम ५१.६ टक्के व गुजराथ ४0 टक्के नोंदवली गेली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधे लक्षव्दिप हा एकमेव प्रदेश असा आहे की जिथे बलात्काराचा एकही गुन्हा घडल्याची नोंद नाही. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश आघाडीवर; हुंडाबळी, अत्याचार प्रकरणांची संख्या मात्र घटलीदेशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची एकुण ३ लाख २७ हजारांहून अधिक प्रकरणे गतवर्षी नोंदवली गेली. त्यात १ लाख ३0 हजार गुन्हे हे लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. तथापि अहवालानुसार २0१४ च्या तुलनेत ही संख्या ३ टक्क्यांनी खाली आली आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तरप्रदेशात आघाडीवर असून या राज्यात ३५ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली तर राजस्थान २८ हजार १६५ घटनांसह ४ थ्या क्रमांकावर आहे.अहवालानुसार चिंताजनक बाब अशी की २0१५ साली देशात ५९ हजार २७७ महिलांचे अपहरण झाले. त्यापैकी ३१ हजार ८८४ महिलांचे अपहरण केवळ विवाहासाठी झाले. २0१४ साली महिलांची छेडछाड करण्याच्या ८२ हजार ६२0 घटना घडल्या तर २0१५ साली त्यात थोडी वाढ होउन ही संख्या ८२ हजार ८00 वर पोहोचली. याच काळात कार्यालयीन छेडछाडीची प्रकरणे ६0 वरून ११९ पर्यंत वाढली. २0१४ साली बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या ४ हजार २३४ घटनांची नोंद होती तर २0१५ याच घटनांची संख्या ४ हजार ४३७ वर गेली. २0१४ साली महिलांवर कौटुंबिक हिंसा व अत्याचाराची ४३0 प्रकरणे नोंदवली गेली तर २0१५ साली अशा गुन्ह्यांची संख्या ४६८ झाली आहे. हुंडाबळी, पती व सासरच्या मंडळीकडून हिंसा, अत्याचार प्रकरणांची संख्या मात्र पूर्वीपेक्षा घटली आहे. देशात बलात्कारांची पहिल्या ५ राज्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.बलात्कारित महिलांची सर्वाधिक संख्या १६ ते ३0 वयोगटातली आहे. सर्वात घृणास्पद बाब म्हणजे १६0२ बलात्काराच्या पीडित फक्त ६ ते १२ वयाच्या लहान मुली आहेत. बलात्काराचे ९५.५ टक्के संशयित आरोपी पीडित महिलेचे परिचित अथवा आप्तस्वकिय आहेत.