शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदींचे 10 पैकी 7 मंत्री RSS शी संबंधित...", TMC नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 10:51 IST

डेरेक ओब्रायन गुरुवारी म्हणाले, पंतप्रधान मोदी संघाचे दुसरे सरसंघचालक एमएस गोळवलकर यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सभागृत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) प्रशंसा केल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात काँग्रेससह अनेक पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. यातच, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते डेरेक ओब्रायन यांनी दावा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये 10 पैकी 7 मंत्री आरएसएसशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातही याच प्रकारचे विधान केले आहे. डेरेक ओब्रायन गुरुवारी म्हणाले, पंतप्रधान मोदी संघाचे दुसरे सरसंघचालक एमएस गोळवलकर यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. टीएमसी नेत्याने नुकताच लिहिलेला एक लेख एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे, "मोदी आरएसएसच्या गोळवलकर यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत." त्यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांची आसएसेसवर टीका केलेली एक पोस्ट देखील शेअर केली आहे. 

आरएसएस समर्थकांना सैनिक शाळा चालवण्याचे ठेके - डेरेक ओब्रायनआपल्या ब्लॉगवर शेअर करण्यात आलेल्या लेखात ओब्रायन यांनी म्हटले आहे, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये 10 पैकी 7 मंत्री संघ परिवाराशी संबंधित आहेत. 10 पैकी चार राज्यपाल माजी प्रचारक तथा आरएसएस आणि त्याच्या सहकारी संघटनांचे स्वयंसेवक आहेत. तसेच भाजपचे सरकार असलेल्या 12 राज्यांपैकी आठ राज्यांतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही स्वयंसेवक आहेत. याशिया, सैनिकी शाळा चालविण्याचे 10 पैकी 8 ठेके आरएसएस समर्थकांना अथवा संबंधित संघटनांना देण्यात आले आहेत.

आरएसएसवर तीन वेळा घालण्यात आली आहे बंदी -ओब्रायन म्हणाले, आरएसएसने भारतीय स्वातंत्र्य संग्रामापासून स्वतःला दूर ठेवले आणि 1930 च्या दशकात महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा अथवा मिठाचा सत्याग्रह सुरू केला, तेव्हा आरएसएसचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांनी, यात संघटना भाग घेणार नाही, अशी घोषणा केली होती. याशिवाय, देश स्वतंत्र झाल्यानंतर, भारत सरकारने संघावर तीन वेळा बंदी आणली होती, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपा