शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाला ७ महिने पूर्ण; शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 06:06 IST

संयुक्त किसान मोर्चाने आधीच घोषित केल्याप्रमाणे कृषी कायदे रद्द करा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल यासाठीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवले आहे

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनामुळे महामार्गावरील ट्रॅफिक जाम

विकास झाडेलोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेला कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी दिल्लीतील सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. विविध राज्यांमध्ये राज्यपालांना निवेदन देण्यात आले. चंदीगडमध्ये शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून राजभवनात जाण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतही शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संयुक्त किसान मोर्चाने आधीच घोषित केल्याप्रमाणे कृषी कायदे रद्द करा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल यासाठीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवले आहे. हे निवदेन शनिवारी राज्यपालांच्या सुपूर्द करण्यात आले आहे. चंदीगडमध्ये पंचकुला आणि मोहाली येथील ३२ संघटनांच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह प्रवेश केला. जिल्हाधिकारी मनदीपसिंग ब्रार आणि एसएसपी कुलदीपसिंग चहलही घटनास्थळी पोहोचले. इथे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय महासचिव युद्धवीर सिंह, दिल्ली प्रदेश अध्यक्ष विरेंद्र डागर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीत नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.  दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी अटक केल्याची चर्चा होती. परंतु ते गाझीपूर सीमेवर असल्याचा त्यांनी खुलासा केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नाही. शेवटी आम्हाला राष्ट्रपतींना निवेदन देण्याशिवाय पर्याय उरला नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन