चेन्नई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणारे एक रॅकेट उद्ध्वस्त केले. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, यात चेन्नईतील कापड व्यापारी आणि दोन दक्षिण कोरियन नागरिक आहेत. त्यांच्याकडून ७ किलो सोने आणि ११.१६ कोटी रुपयांची रोख जप्त करण्यात आली आहे.अधिकाºयांनी सांगितले की, या सोन्याची हाँककाँगहून तस्करी करण्यात आली होती. चेन्नईतील एका हॉटेलात एक जण शिरत असताना त्याला अधिकाºयांनी घेरले, तेव्हा त्याच्याकडील बॅगमधून ६ किलो सोने जप्त करण्यात आले. त्यानंतर एका व्यापाºयाच्या घर आणि दुकानांवर छापे मारून डीआरआयच्या अधिकाºयांनी १ किलो सोने आणि ११.१६ कोटी रुपयांची रोख जप्तकेली. (वृत्तसंस्था)>सव्वादोन कोटींचे सोने पकडलेत्रिची : तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाºयांनी पाच प्रवाशांकडून ७.७ किलो सोने पकडले. या सोन्याची किंमत २.३० कोटी रुपये आहे. हे प्रवासी सिंगापूर, क्वालालम्पूर, कोलंबो, शारजा येथून आले होते.
७ किलो सोने, ११ कोटींची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 04:53 IST