अहमदाबाद - गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरात रिक्षा आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. मानकुवार परिसराती मार्गावर हा अपघात झाला असून, हा अपघात एवढा भयंकर होता की त्यात रिक्षाचा अक्षरश चेंदामेंदा झाला. या अपघातात 7 जण मृत्युमुखी पडले. तर 10 जण जखमी झाले.
गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 16:01 IST