शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

गोव्यातील मंत्र्यांच्या ‘विदेशवारी’साठी ७ कोटी!

By admin | Updated: August 12, 2015 02:41 IST

विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या नावाखाली गोव्याच्या पर्यटन खात्याकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मंत्री-आमदारांच्या परदेश दौऱ्यावर टीका होत असताना यंदा पुन्हा विदेशवारीचा

- राजू नायक, पणजीविदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या नावाखाली गोव्याच्या पर्यटन खात्याकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मंत्री-आमदारांच्या परदेश दौऱ्यावर टीका होत असताना यंदा पुन्हा विदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे. त्यासाठी सात कोटी रुपये उधळण्याचे निश्चित केल्याची माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.जगातील सात देशांत सहल जाणार असून त्यांची कंत्राटे पर्यटन क्षेत्रातील सात कंपन्यांना वाटून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे संबंधित कंपन्यांनी आपसात स्पर्धा करण्याऐवजी सर्व मिळून राजकारणी व उच्चपदस्थांना खूश करून राजीखुशी नफा कमावण्याची ही कल्पना आहे. मॉस्को, पॅरिस, सिंगापूर, लंडन, स्पेन, बर्लिन व इस्राएल येथे मंत्री व आमदारांचे शिष्टमंडळ भेट देईल.कंत्राटे दिलेल्या कंपन्या व त्याच्या रकमेची यादीच ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. ही यादी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. मॉस्को येथील सहलीसाठी ९९ लाख ३७ हजार ४९४ रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. ते मुंबईस्थित ‘गोल्ड माईन’ कंपनीला मिळणार आहे. यादीत शॉन व विन्सन या दोन गोमंतकीय कंपन्या आहेत. त्यांना इस्राएल तसेच पॅरिस व सिंगापूरची कंत्राटे मिळणार आहेत. विदेशी पर्यटक घटले !गोवा सरकारने गेल्या दोन वर्षांत विदेश दौऱ्यांवर २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे उधळले आहेत. या कालखंडात मंत्र्यांनीच विदेशवारीच्या नावावर साडेसहा कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र या काळात गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्याही घटली आहे. २०१३-१४ मध्ये गोव्यात येणाऱ्या चार्टर्ड विमानांची संख्या १,१४१ होती. मागील वर्षी ती ८८९ इतकी खाली आली. गोवा सरकारच्या पर्यटन विपणन विषयक समितीचे एक सदस्य गौरिष धोंड यांनी मात्र, विदेश दौऱ्यांचे समर्थन करताना आंतरराष्ट्रीय महोत्सवात मंत्र्यांचा सहभाग वेगवान निर्णय प्रक्रियेसाठी आवश्यक ठरतो, अशी प्रतिक्रिया दिली.