आम्रपाली एक्सप्रेसचे ७ डब्बे रुळावरुन घसरले, जिवीतहानी नाही
By Admin | Updated: December 20, 2015 11:07 IST2015-12-20T09:39:58+5:302015-12-20T11:07:12+5:30
बिहारच्या खागरीया जिल्ह्यामध्ये रविवारी पहाटे अमृतसरच्या दिशेने जाणा-या आम्रपाली एक्सप्रेसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

आम्रपाली एक्सप्रेसचे ७ डब्बे रुळावरुन घसरले, जिवीतहानी नाही
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - बिहारच्या खागरीया जिल्ह्यामध्ये रविवारी पहाटे अमृतसरच्या दिशेने जाणा-या आम्रपाली एक्सप्रेसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. कटीहारहून अमृतसरच्या दिशेने जाणा-या आम्रपाली एक्सप्रेसचे सात डब्बे रविवारी पहाटे रुळावरुन घसरले.
खागरीया जिल्ह्यात पसरहा स्थानकाजवळ हा अपघात झाला. इतके डब्बे रुळावरुन घसरुनही सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्त अनिल सक्सेना यांनी दिली. सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी असून, दाट धुक्यांमुळे हा अपघात झाला. एक्सप्रेसचा वेग कमी असल्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.
आम्रपाली एक्सप्रेसचे पाच स्लीपर आणि दोन वातानुकूलित डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातामुळे राजधानी एक्सप्रेससह अन्य ट्रेनचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती सक्सेना यांनी दिली