६७९ मतदारांचा ग्रामपंचायत हद्दीत समावेश करावा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:04+5:302015-03-08T00:31:04+5:30

अहमदनगर : नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीतील ६७९ मतदारांची नावे महानगरपालिका मतदार यादीत नोंदली गेली असून, ही नावे पुन्हा ग्रामपंचायतीच्या यादीत नोंदविण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानावाधिकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे़

679 voters should be included in the Gram Panchayat limits | ६७९ मतदारांचा ग्रामपंचायत हद्दीत समावेश करावा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

६७९ मतदारांचा ग्रामपंचायत हद्दीत समावेश करावा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

मदनगर : नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीतील ६७९ मतदारांची नावे महानगरपालिका मतदार यादीत नोंदली गेली असून, ही नावे पुन्हा ग्रामपंचायतीच्या यादीत नोंदविण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानावाधिकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे़
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुक्यातील नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत असणार्‍या साईनगर, भोर वस्ती, सप्रेमळा, दत्तानगर, कोतोरे मळा आदी परिसरातील रहिवाशांचा सुरुवातीपासून पारनेर विधानसभा मतदारसंघात समावेश आहे़ त्यांचे नावेही मतदार यादीत आहेत़ मागील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी मतदानही केले होते़ त्यांच्याकडे ग्रामपंचायत हद्दीतील शिधापत्रिका आहे़ मात्र, या परिसरातील ६७९ मतदारांची नावे शहर विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ करण्यात आली़ सध्या नवनागापूर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे़ या मतदारांची नावे दुसरीकडेच समाविष्ट केल्याने येथील रहिवासी असूनही त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे़ याबाबत पूर्ण चौकशी करून या मतदारांची नावे पुन्हा नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे़ संघाचे रोहिदास केदार, बन्सी घोडेराव, बाळासाहेब थोरात सोपान ठुबे यांनी जिल्हाधिकार्‍यांना याबाबत निवेदन दिले आहे़
.....
फोटो आहे़

Web Title: 679 voters should be included in the Gram Panchayat limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.