जिल्हा बँक निवडणुकीत ६७ उमेदवारांची माघार
By Admin | Updated: April 25, 2015 02:10 IST2015-04-25T02:10:39+5:302015-04-25T02:10:39+5:30
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या एकूण ११२ उमेदवारापैकी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ६७

जिल्हा बँक निवडणुकीत ६७ उमेदवारांची माघार
न ंदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या एकूण ११२ उमेदवारापैकी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ६७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. नामनिर्देशन मागे घेण्यासाठी २४ एप्रिल हा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारांची गर्दी झाली होती. मतदार संघनिहाय उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार असे- त्यात शेती व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था भोकर मतदारसंघातून- माधवराव कामाजी कदम, आप्पाराव तात्याराव देशमुख, मारोतराव भोजन्ना बल्लाळकर, गंगाधर लक्ष्मणराव सक्करगे, उमरी तालुका-रेखाताई बाळासाहेब पाटील, गणेश भिवसेन गाढे, हदगाव-बाबुराव गुणाजीराव कदम, किशोर आनंदराव कदम, बाबुराव यादवराव पवार, हिमायतनगर- माधवराव निवृत्तीराव पवार, मुखेड-हणमंतराव व्यंकटराव पाटील, भाऊसाहेब खुशालराव पाटील, कंधार-विलासराव महाजन शिंदे, हरिहरराव विश्वनाथराव भोसीकर, संभाजीराव नागोबाराव केंद्रे, लोहा-ज्ञानोबा लालुजी बाबर,रघुनाथ धोंडीबा पवार, देगलूर-मारोतराव गोविंदराव पाटील, संग्राम बसप्पा धनुरे, नायगाव-श्रावण शंकरराव भिलवंडे, परसराम देवराव जाधव बिलोली- आनंदराव गुंडप्पा बिरादार, लक्ष्मण गंगाराम ठक्करवाड, परमेश्वर मारोतराव पाटील, नांदेड तालुका-भगवानराव माधवराव पाटील, राजेश भाऊराव पावडे, मधुकर बापुराव वाघ, अर्धापूर तालुका-मोतीराम गंगाराम जगताप, बाबुराव महादजी कदम, संजय अण्णासाहेब देशमुख, मुदखेड तालुका- धोंडीबा जनार्धन बोडके, गोविंदराव नारायणराव खटींग, सुनील सुधाकरराव देशमुख, किनवट-पंडित रघुनाथ कदम, माहूर महिला राखीव मतदारसंघातून व धर्माबाद महिला राखीव मतदार संघातून एकाही उमेदवारांची माघार नाही. बिगर शेती मतदार संघात (ब) नागरी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, बिगर शेती ग्रा.प.संस्था, पगारदार, प्रक्रिया व पणन या मतदार संघातून प्रकाश उत्तमराव पोपळे, गणपतराव शामराव तिडके, संजय नारायणराव आनेवार, संभाजी महाजनराव आलेवाड, संजय ईश्वरराव भोसीकर, भगवान भाऊसाहेब मोरे, वसंतराव बळवंतराव चव्हाण, अशोक मोहनराव जाधव, रोहिदास खोब्राजी चव्हाण, संजय माधवराव पाटील व शिवराम तुकाराम लुटे या अकरा उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच (क) इतर सर्व सहकारी संस्था व वैयक्तीक सभासद बिगरशेती मतदार संघातून भाऊसाहेब माणिकराव पाटील, आनंद शंकरराव चव्हाण, व्यंकटराव मुकुंदराव नेम्मानीवार, अनिता दत्ता येवते, अमरनाथ अनंतराव राजुरकर यांनी मागे घेतला. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून दत्ता गंगाराम चंदनफुले, विजय शंकरराव सोनवणे, व्यंकटराव मंगाजीराव लोहबंदे, सविता रामचंद्र मुसळे यांनी तर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून संजय ईश्वरराव भोसीकर, बाबाराव जमनाजी एंबडवार, शिवसांब गोविंदराव बारसे, मारोती संभाजी पांचाळ व विठ्ठल तुकाराम जनकवाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघातून व्यंकटराव मारोतीराव जाळणे, सुधाकर गंगाधर पिलगुंडे, देविदास विठ्टलराव सरोदे, ज्ञानेश्वर तुकाराम आलेवार, भारत गोविंदराव रॅपनवाड, मारोतराव भोजन्ना बल्लाळकर, प्रल्हाद मोतीराम सुरकुटवार व भाऊराव खुशालराव पाटील या आठ उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेतले.अशा एकूण ११२ उमेदवारापैकी ६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला असून ४५ उमेदवार रिंगणात आहेत.