आयकर विभागाची ६६ लाखांनी फसवणूक
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:25+5:302015-02-10T00:56:25+5:30
हायकोर्ट : आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

आयकर विभागाची ६६ लाखांनी फसवणूक
ह यकोर्ट : आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळलानागपूर : आयकर विभागाची ६६ लाख ४६ हजार ५१० रुपयांनी फसवणूक करण्याच्या प्रकरणातील एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे.जगदीश मंगलानी असे आरोपीचे नाव असून तो धंतोलीतील गॅस पॉईन्ट कंपनीत कार्यरत होता. आयकर विभागातील वरिष्ठ कर सहायक सुमित मुखर्जीने जगदीश व इतर आरोपींसोबत मिळून हा गैरव्यवहार केला आहे. मुखर्जीला वैद्यकीय कारणावरून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मुखर्जी करदात्यांना रक्कम परत करण्याच्या धनादेशावर अधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करीत होता. तसेच, हे धनादेश सहआरोपींच्या नावाने वठवत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सदर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३८०, ४२०, ४६८, ४७१, १२०-ब अन्वये गुन्हा नोंदविला आहे. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एम. जे. खान यांनी बाजू मांडली.