सतरा जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: July 10, 2015 00:31 IST2015-07-09T21:53:16+5:302015-07-10T00:31:06+5:30
१०४ इच्छुकांची माघार, २६ जुलैला मतदान

सतरा जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात
१०४ इच्छुकांची माघार, २६ जुलैला मतदान
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काल (दि.९) अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत १६८ उमेदवारांपैकी १०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतली असून, निवडणुकीच्या रिंगणात ६३ उमेदवार आहेत. हमाल आडते गटातून चंद्रकांत निकम यांचा एकमेव अर्ज असून, त्यांची बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे.
गुरुवारी (दि.९) सकाळपासूनच अर्ज माघारीसाठी सर्वच पॅनलकडून इच्छुकांची मनधरणी करण्यात येत होती. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात देवीदास पिंगळे व शिवाजी चुंबळे यांच्या समर्थकांची किरकोळ कारणावरून बाचाबाची झाल्याचे समजते. यावेळी नगरसेवक दामोदर मानकर व मखमलाबाद येथील तरुणांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक घडल्याची चर्चा होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. यावेळेत १६८ उमेदवारांपैकी १०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यात आमदार अपूर्व हिरे, दौलत पाटील, रत्नाकर चुंबळे, रावसाहेब कोशिरे यांच्यासह काही आजी-माजी संचालकांचा अर्ज माघारी घेण्यामध्ये समावेश होता.
(प्रतिनिधी)
इन्फो..
शिल्लक अर्ज व प्रवर्गनिहाय उमेदवारांची संख्या अशी- कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या -
सर्व साधारण सोसायटी गट- एकूण अर्ज - ६१, शिल्लक अर्ज २४ (३७), महिला राखीव - १० - ७ (३), इतर मागास प्रवर्ग - १३ - ३ (१०), भटक्या विमुक्त जाती जमाती - ११ - २ (९), ग्रामपंचायत सर्व साधारण गट - २३ - ९ (१२), अनुसूचित जाती-जमाती - १९ - ८(११) आर्थिक दुर्बल - १० - ४ (६), व्यापारी आडते - २१ - ५ (१६) असे एकूण १६८ उमेदवारांपैकी १०४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने १७ संचालक पदांच्या जागांसाठी ६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.