शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

सायबर फसवणुकीत 6,291 अटकेत, २६६ मोबाईल ॲप्सवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 2:56 PM

mobile apps : इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांत १८० टक्के वाढ झाली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हेही वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्ह्यांत १८० टक्के वाढ झाली आहे.गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत दाखल झालेल्या सायबर गुन्ह्यांची संख्या ३४६६ वरून ६२३३ झाली आहे.राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोकडील आकडेवारीच्या आधारे रेड्डी म्हणाले की, २०१९ मध्ये या गुन्ह्यांत २५४२ जणांना अटक झाली होती. २०१८ मध्ये १७७८ जणांना, तर २०१७ मध्ये १९७१ जणांना पकडले होते.शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाने यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेड्डी यांनी संसदेत मान्य केले की, इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्हे वाढले आहेत. हे गुन्हे रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारी यंत्रणा कायद्यातील तरतुदींनुसार अशा गुन्ह्यांत कारवाई करते. यासाठी माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांची सेवाही घेतली जाते. याशिवाय राज्य आणि केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आयटीचे प्रशिक्षण दिले जाते. ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी उचललेल्या पावलांच्या प्रश्नावर रेड्डी म्हणाले की, केंद्र सरकारकडून याबाबत राज्यांना इशारा आणि सूचना दिल्या जात आहेत. याशिवाय राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलही सुरू केले गेले आहे आणि डिजिटल पेमेंटला सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुरक्षा आणि जोखीम किमान करण्याच्या उपायांसाठी निर्देश दिले आहेत. 

२६६ मोबाइल ॲप्सवर बंदीचिनी ॲप्सवर बंदीच्या प्रश्नावर रेड्डी यांनी सांगितले की, सरकारने आयटी कायदा, २००० अंतर्गत २६६ मोबाइल ॲप्सवर बंदी घातली आहे. हे ॲप्स लोकहितविरोधी होते आणि मोठ्या संख्येत आकडेवारी गोळा करून देशाची सुरक्षा, अखंडता आणि लोकव्यवस्थेची हानी करण्यासाठी तिचा वापर करीत असल्याची शंका होती.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमIndiaभारत