काळा पैसाप्रकरणी ६२७ जणांची नावे सुप्रीम कोर्टात सादर
By Admin | Updated: October 29, 2014 11:46 IST2014-10-29T10:56:40+5:302014-10-29T11:46:27+5:30
परदेशी बँकांमधील काळा पैसाप्रकरणातील ६२७ जणांची नावे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली आहेत.

काळा पैसाप्रकरणी ६२७ जणांची नावे सुप्रीम कोर्टात सादर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - परदेशी बँकांमधील काळा पैसाप्रकरणातील ६२७ जणांची नावे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली आहेत. बुधवारी केंद्र सरकारने तीन बंद लिफाफ्यांमध्ये खातेदारांची नावे, त्यांचा खाते क्रमांक आणि रक्कम यांची माहिती या यादीत देण्यात आली आहे.
यापूर्वी सोमवारी केंद्र सरकारने सर्व खातेधारकांची नावे सादर न करता काळा पैसा ठेवल्याच्या आरोपावरून खटले दाखल केले गेले आहेत अशा फक्त आठ व्यक्तींची नावे न्यायालयाकडे सुपूर्त केली होती. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी करत सरकाराने हातचे काहीही न राखता भारतीयांच्या परकीय बँकांमधील खात्यांविषयी इतर देशांकडून मिळालेली सर्व माहिती २४ तासांत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. हे तीन लिफाफे न उघडता ते थेट एसआयटीकडे (विशेष तपास पथकाकडे) सादर करण्यात यावेत असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच तपास पथकाने नोव्हेंबर महिन्यात काळा पैशाबाबतचा सद्यस्थिती अहवाल सादर करावा आणि मार्चपर्यंत सर्व चौकशी पूर्ण करावी असा आदेशही न्यायालयातर्फे देण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३ डिसेंबर रोजी होणार आहे.