शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

६२% सैनिकी शाळा भाजप-संघाकडे? संरक्षण मंत्रालयाने दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 06:56 IST

Education Sector: देशात सुरू होणाऱ्या नव्या सैनिकी शाळा चालवण्याची जबाबदारी भाजप-आरएसएसशी संबंधित असलेल्यांना देण्यात येत असल्याचा दावा करणारा अहवाल संरक्षण मंत्रालयाने फेटाळला.

नवी दिल्ली - देशात सुरू होणाऱ्या नव्या सैनिकी शाळा चालवण्याची जबाबदारी भाजप-आरएसएसशी संबंधित असलेल्यांना देण्यात येत असल्याचा दावा करणारा अहवाल संरक्षण मंत्रालयाने फेटाळला.

सरकारने ६२ टक्के नवीन सैनिकी शाळांची जबाबदारी संघ परिवार आणि भाजप नेत्यांशी संबंधित लोकांना दिली आहे, असा दावा ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्म ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’ने आपल्या वृत्तात केला आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ‘सैनिकी शाळांबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार आहेत. आमच्याकडे ५०० हून अधिक अर्ज आले होते, त्यापैकी आतापर्यंत आम्ही ४५ शाळांचे अर्ज मंजूर केले आहेत.

अशी आहे निवड प्रक्रियाशाळा मूल्यांकन समिती आहे. यामध्ये सैनिक स्कूल किंवा नवोदय शाळेच्या मुख्याध्यापकांचा समावेश करून जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करण्यात आले. अर्ज करणाऱ्या शाळेला भेट देऊन पडताळणी करण्यात येते. अध्यक्ष म्हणून सैनिक स्कूल सोसायटीचे सहसचिव, सीबीएसईचे सचिव आणि एक शिक्षण तज्ज्ञ सदस्य म्हणून असतात. 

१०० सैनिकी शाळा...सरकारने देशभरात १०० सैनिकी शाळा उघडण्याची योजना लागू केली होती. याअंतर्गत अनेक स्वयंसेवी संस्था, राज्य सरकार आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी क्षेत्राशी भागीदारी करण्यात आली. 

अतिशय विचारपूर्वक शाळांचे नियोजनमंत्रालयाने म्हटले आहे की, ‘नवीन सैनिकी शाळांचे नियोजन अतिशय विचारपूर्वक केले गेले आहे. त्यांची निवड प्रक्रिया अत्यंत कठोर आहे. ती संतुलित ठेवली गेली आहे जेणेकरून त्याचे उद्दिष्ट साध्य होईल आणि त्याच वेळी पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक आर्थिक मदत दिली जाईल. त्याची सतत छाननी होते. अर्जदाराचा राजकीय कल किंवा विचारसरणी किंवा इतर कशानेही निवड प्रक्रियेत फरक पडत नाही. या प्रक्रियेचे राजकारण करणे किंवा योजनेच्या उद्देशाबद्दल गैरसमज निर्माण करणे चुकीचे आहे.’

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार