६२ शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा खंडित शेतकरी संकटात : वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी

By Admin | Updated: December 14, 2014 00:07 IST2014-12-12T23:49:15+5:302014-12-14T00:07:58+5:30

औराद शहाजानी : तेरणा नदीवरील तगरखेडा उच्चस्तरीय बंधार्‍यात यंदा प्रथमच पाणी साठवण्यात आले आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या शेतकर्‍यांना पाणी मिळण्याची आशा असतानाच महावितरणच्या अधिकार्‍यांनी शेतीसाठीच्या ६२ विद्युत पंपाचा वीज पुरवठा तोडल्याने शेतकर्‍यांपुढे दुष्काळात तेरावा महिना निर्माण झाला आहे़

62 farmers demand electricity supply to breakaway farmers: | ६२ शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा खंडित शेतकरी संकटात : वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी

६२ शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा खंडित शेतकरी संकटात : वीज पुरवठा सुरु करण्याची मागणी

औराद शहाजानी : तेरणा नदीवरील तगरखेडा उच्चस्तरीय बंधार्‍यात यंदा प्रथमच पाणी साठवण्यात आले आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या शेतकर्‍यांना पाणी मिळण्याची आशा असतानाच महावितरणच्या अधिकार्‍यांनी शेतीसाठीच्या ६२ विद्युत पंपाचा वीज पुरवठा तोडल्याने शेतकर्‍यांपुढे दुष्काळात तेरावा महिना निर्माण झाला आहे़
औराद परिसरातील तेरणा नदीवरील तगरखेडा येथील कोल्हापूरी पाटबंधार्‍याचे रूपांतर उच्चस्तरीय बंधार्‍यात करण्यात आले आहे़ या नवीन उच्चस्तरीय बंधार्‍यास दारे टाकण्यासाठी शेतकर्‍यांनीच पुढाकार घेतला़ त्यामुळे प्रशासनाने दारेही लावली होती़ दरम्यान, प्रशासनाने पाणी सोडण्याची तारीख संपली म्हणून औराद कोल्हापूरी पाटबंधार्‍यातील पाणी कर्नाटकला निष्फळ सोडून दिले होते़
यंदाच्या चालू हंगामात या बंधार्‍यावर दारे टाकलीच नाहीत़ त्यामुळे हा बंधारा कोरडाच राहिला आहे़ तगरखेडा बंधार्‍यात सध्या पाणीसाठा उपलब्ध आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या शेतीसाठी या पाण्याचा उपयोग सुरु केला होता़ परंतु, गुरुवारी अचानक महावितरणच्या अधिकार्‍यांनी या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़

कोट़़़
पाणी आरक्षित करण्यात आल्यामुळे तहसिलदारांच्या आदेशानुसार महावितरणने या बंधार्‍यावरील ६२ शेतकर्‍यांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे, असे कनिष्ठ अभियंता एस़ डी़ डोंगरे यांनी सांगितले़

Web Title: 62 farmers demand electricity supply to breakaway farmers:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.