शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Amritsar Train Accident : रावणदहन पाहाणाऱ्या ६१ जणांना रेल्वेने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 5:49 AM

#AmritsarTrainAccident : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली.

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या अमृतसरच्या भीषण दुर्घटनेत ६१हून अधिक जण ठार, तर ७२ जण जखमी झाले. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या १००वर जाण्याची शक्यता आहे.

रावणदहन पाहाण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते. रावणदहनावेळी फटाके फुटू लागल्याने त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील ३०० हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळांत जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहाण्यात व त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करण्यात इतके मश्गुल होते की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरून ट्रेन येत असल्याचे भानही त्यांना राहिले नाही. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुसºया ट्रेनखाली आले. थरकाप उडविणाºया या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यास तिथे हजर असलेल्यांपैकीच अनेक जण पुढे सरसावले. जखमींना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले.

दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला व मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली. रेल्वे अधिकाºयांनी घटनास्थळी मदतकार्य सुरु केले. या मदतकार्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल लक्ष ठेवून आहेत. अमेरिका दौºयातील सर्व कार्यक्रम रद्द करून पीयूष गोयल भारतात परत येत आहेत.जीव वाचविण्याची संधी मिळाली नाहीजालंधरहून अमृतसरकडे ट्रेन येत असतानाच विरुद्ध दिशेनेही दुसरी ट्रेन आली. त्यामुळे रुळांवर उभे असलेल्या बेसावध लोकांना आपला जीव वाचविण्याकरिता धावपळ करायची उसंतही मिळाली नाही.

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटना