शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

तान्हुली पावलं येती घरा...भारतात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म; जागतिक विक्रमाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 20:43 IST

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी भारतानं जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ६० हजाराहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे.

नवी दिल्ली-नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२२ रोजी भारतानं जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात ६० हजाराहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे. विशेष म्हणजे हा जागतिक विक्रम ठरला आहे. इतर कोणत्याही देशात इतक्या मोठ्या संख्येनं १ जानेवारी रोजी बालकांचा जन्म झालेला नाही. दरम्यान, यावर्षीचा आकडा २०२० पेक्षा ७ हजार ३९० नं कमीच आहे. 

युनिसेफनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतापाठोपाठ चीनमध्ये यावर्षी १ जानेवारी रोजी ३५ हजार ६१५ बालकांच्या जन्माची नोंद झाली आहे. तर संपूर्ण जगात नववर्षाच्या पहिल्या दिवशी एकूण ३ लाख ७१ हजार ५०४ हून अधिक चिमुकल्यांनी या भूतलावर जन्म घेतला आहे. यातील ५२ टक्के चिमुकली मुलं तर केवळ १० देशांमध्ये जन्मली आहेत. 

"जगभरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या बालकांमध्ये भारत (५९,९९५), चीन (३५,६१५), नायजेरिया (२१,४३९), पाकिस्तान (१४,१६१), इंडोनेशिया (१२,३३६), इथिओपिया (१२,००६), यूएस (१०,३१२), इजिप्त (९,४५५), बांगलादेश (९२३६) आणि डेमॉक्रेटिक रिपलब्लिक ऑफ काँगो (८,६४०) हे १० देश आघाडीवर आहेत", असं यूनिसेफनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे. 

अहवालानुसार २०२१ या वर्षात भारतात जन्मलेल्या बालकांचं आर्युमान ८०.९ वर्ष इतकं असणार आहे. भारत सरकारनं नवाज बालकांसाठी उभारलेल्या विशेष केअर युनिट्सच्या पुढाकारामुळे देशात नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण देखील कमी झालं आहे. यामुळे दरदिवसामागे १ हजार बालकांची भारताची क्षमता वाढली आहे. २०१४ ते २०२० या काळात जवळपास ३२० जिल्ह्या पातळीवरील विशेष केअर युनिट्सची उभारणी सरकारनं केली आहे. 

टॅग्स :New Yearनववर्षnew born babyनवजात अर्भक