६००० कोटींच्या निविदा अखेर रद्द
By Admin | Updated: August 30, 2014 02:46 IST2014-08-30T02:46:31+5:302014-08-30T02:46:31+5:30
लष्कर आणि वायुदलासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या १९७ हलक्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसंबंधी घोटाळ्याचा आरोप असलेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा संरक्षण मंत्रालयाने रद्द केल्या आहेत

६००० कोटींच्या निविदा अखेर रद्द
नवी दिल्ली : लष्कर आणि वायुदलासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या १९७ हलक्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसंबंधी घोटाळ्याचा आरोप असलेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा संरक्षण मंत्रालयाने रद्द केल्या आहेत. चिता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा नवे हेलिकॉप्टर घेणार होते. सियाचीनसारख्या उंच पर्वतीय भागात लष्कर आणि सामग्रीची हालचाल करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार होता.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत १७,५०० कोटी रुपयांच्या अन्य काही सौद्यांना मंजुरीही देण्यात आली. आयुष्य संपत असलेल्या पाणबुड्यांच्या मध्यंतरीच्या काळातील अत्याधुनिकीकरणासाठी
४८०० कोटी रुपयांच्या खर्चाला तसेच ११८ अर्जुन-२ रणगाड्यांच्या खरेदीसाठी ६६०० कोटी रुपयांच्या सौद्यावर परिषदेने मोहोर उमटवली.