शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

'600 मदरसे बंद केले, आणखी 300 बंद करणार'; हिमंता बिस्वा सरमांचा ओवेसींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 23:23 IST

तेलंगणामधून हिमंत बिस्वा सरमांची ओवेसींवर टीका.

हैदराबाद: तेलंगणामध्ये भाजपने आयोजित केलेल्या हिंदू एकता रॅलीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) सहभागी झाले होते. यादरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर थेट निशाणा साधला. 'सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी काम करत आहे. यावर्षी 300 मदरशांवर कारवाई करणार, अशी टीका बिस्वा सरमा यांनी केली.

रॅलीत पुढे बोलताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, 'आम्ही आसाममध्ये लव्ह जिहादच्या विरोधात काम करत आहोत. आसाममधील मदरसे बंद करण्याचे काम आमचे सरकार करत आहे.  मला ओवेसींना सांगायचे आहे की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आसाममधील 600 मदरसे बंद केले. आता यावर्षी आणखी 300 मदरसे बंद करणार आहे.'

मदरशांवर काय म्हणाले होते ओवेसी?यापूर्वी असदुद्दीन ओवेसी यांनी आसाममधील मदरशांवर सुरू असलेल्या कारवाईबाबत वक्तव्य केले होते. या वर्षी जानेवारी महिन्यात ओवेसी यांनी ट्विट केले होते की, 'आसाम हा परदेशी देश नाही जिथे भारतीयांनी तुमच्याकडून परवानगी घ्यावी. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा लोकांचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. आरएसएस संचालित शाळांमधील शिक्षकांचे काय? आसाममधील लोकांवर इतर राज्यांनीही असेच नियम लागू केले तर? असे ट्विट त्यांनी केले होते.

काँग्रेसच्या कर्नाटक विजयावर टोला दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर खिल्ली उडवली. भाजपची सचिन तेंडुलकरशी तुलना करताना ते म्हणाले की, कधी कधी तो शून्यावरही आऊट होतो. काँग्रेसने एक राज्य जिंकले आणि एवढा गाजावाजा करत आहे. भाजपने अनेक राज्ये जिंकली, पण असा गाजावाजा केला नाही.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAssamआसामhyderabad-pcहैदराबादTelanganaतेलंगणा