शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दक्षिणही मंदिर राजकारणाच्या वाटेवर; KCR यांचा हनुमान मंदिरासाठी ६०० कोटी निधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 06:34 IST

‘आम्ही प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करत आहोत’, असे तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे खासदार के. केशवराव यांनी सांगितले

हैदराबाद : राजकीय पक्षांनी २०२४ची तयारी सुरू केली आहे. उत्तर भारताच्या राजकारणात धर्म आणि धार्मिक स्थळांचे वर्चस्व असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते. दक्षिण भारतही आता मंदिर राजकारणाच्या वाटेवर चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दोन दिवसांपूर्वी कोंडागट्टू जिल्ह्यातील अंजनेय स्वामी मंदिराच्या जीर्णोद्धाराची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी ६०० कोटींचा निधी जारी केला आहे. ‘आम्ही प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करत आहोत’, असे तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे खासदार के. केशवराव यांनी सांगितले. दुसरीकडे आंध्र प्रदेशचे सरकार तब्बल १४०० मंदिरे बांधत असतानाही जगमोहन रेड्डी यांचे सरकार ही राजकीय खेळी असल्याचे मानत नाही. एकूणच दक्षिण भारतात आता मंदिर निर्माणांच्या कामांना तेथील सरकारांनी प्राधान्य दिले आहे.

आंध्र प्रदेश सरकार १४०० मंदिरे बांधतेयजगन मोहन सरकारने यापूर्वीच २६ जिल्ह्यांमध्ये १४०० मंदिरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी १०३० बांधकामे सरकार स्वत:, तर ३३० समरसथ सेवा फाउंडेशन बांधत आहेत. विशेष म्हणजे हे फाउंडेशन आरएसएसशी संलग्न एनजीओ आहे. प्रत्येक मंदिरासाठी ८-८ लाख व मूर्तीसाठी २-२ लाखांची तरतूद आहे. तेलंगणा  सरकारने १८०० कोटी रुपये खर्चून यदागिरिगुट्टा लक्ष्मी नरसिम्हा मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. कर्नाटक सरकारनेही मंदिरांसाठी हजार कोटींची तरतूद केली आहे.

यामुळे भाजपचे नुकसान होईल का? पूर्वी जे पक्ष चर्च वगैरेंना निधी द्यायचे ते आता देखाव्यासाठी मंदिरांबद्दल बोलत आहेत, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केला आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले पक्ष भावनिक अजेंडा पुढे करत आहेत. मात्र त्यांचे वास्तव जनतेला माहीत आहे. भाजप आपल्या विकासाच्या अजेंड्यावर वाढत आहे, असेही ते म्हणाले.