66 वर्षाच्या म्हाता-याने काढली 60 वर्षीय आजींची छेड

By Admin | Updated: June 3, 2017 12:19 IST2017-06-03T12:15:20+5:302017-06-03T12:19:26+5:30

धक्कादायक म्हणजे त्यांनी घरात घुसून ही छेडछाड केली

A 60-year-old grandmother of 66-year-old Madhav | 66 वर्षाच्या म्हाता-याने काढली 60 वर्षीय आजींची छेड

66 वर्षाच्या म्हाता-याने काढली 60 वर्षीय आजींची छेड

>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 3 -  चित्रपटातील "दिल तो बच्चा है जी" गाण्याचं जिवंत उदाहरण गुजरातमधील अहमदाबादमध्ये तेव्हा पहायला मिळालं जेव्हा 66 वर्षाच्या म्हाता-याने 60 वर्षाच्या आजींची छेड काढली. धक्कादायक म्हणजे त्यांनी घरात घुसून ही छेडछाड केली. पोलिसांनी आरोपी आजोबांना ताब्यात घेतलं आणि तंबी देऊन नंतर सोडून दिलं. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शहरातील रमोल परिसरातील आहे. आरोपी डायबेटिजचा पेशंट आहे. रात्री तीन वाजता त्यांना जाग आली असता ते घराबाहेर आले, आणि शेजारील फ्लॅटचा दरवाजा खुला असल्याचं पाहून थेट आत शिरले. पोलिसांनी सांगितलं की, "फ्लॅटमध्ये घुसल्यानंतर तिथे झोपलेल्या महिलेचा हात पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान महिलेला जाग आली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकल्यानंतर महिलेचे कुटुंबीय आणि शेजारी जमा झाले, आणि आरोपी म्हाता-याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं". 
 
घटनेनंतर दोघांचेही कुटुंबीय पोलीस ठाण्यात पोहोचले. पीडित आजीही यावेळी पोलीस ठाण्यात हजर होत्या. आजोबांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वतीने माफी मागत ते डायबेटिजचे पेशंट असून जाणुनबुजून त्यांनी हे कृत्य केलं नसल्याचं सांगितलं. आजोबांनीही यावेळी पोलिसांकडे लिखीत माफीनामा दिला. त्यानंतर त्यांना तंबी देऊन घरी सोडण्यात आलं. 

Web Title: A 60-year-old grandmother of 66-year-old Madhav