प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन ६० वर्षाच्या महिलेला खांबाला बांधून मारहाण

By Admin | Updated: December 20, 2015 11:44 IST2015-12-20T11:31:43+5:302015-12-20T11:44:19+5:30

गावातील परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका ६० वर्षाच्या वृद्ध महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.

A 60-year-old girl was allegedly raped by a girl on suspicion of love affair | प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन ६० वर्षाच्या महिलेला खांबाला बांधून मारहाण

प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन ६० वर्षाच्या महिलेला खांबाला बांधून मारहाण

ऑनलाइन लोकमत 

आगरतळा, दि. २० - गावातील परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका ६० वर्षाच्या वृद्ध महिलेला खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना त्रिपुरामध्ये घडली आहे. 

दक्षिण त्रिपुरातील चंद्रपूर या छोटयाशा गावात ही घटना घडली. गावातील काही जणांनी अंजली भील या महिलेला परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन चारित्र्यहीन ठरवले. शुक्रवारी संध्याकाळी काही गावक-यांनी जबरदस्तीने तिला घराबाहेर काढले आणि एका खांबाला बांधून मारहाण केली. त्यानंतर तिचे मुंडन करुन तिला सोडून दिले. 
शेजा-यांनी  जखमी अंजलीला रुग्णालयात दाखल केले. अंजलीने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार महिला आणि तीन पुरुषांना अटक केली आहे. यावर्षी जुलै महिन्यात दक्षिण त्रिपुरामध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. ज्यामध्ये महिलेला विवस्त्र करुन तिला आधी मारहाण करण्यात आली नंतर तिचे अर्धे मुंडन करण्यात आले होते. 

Web Title: A 60-year-old girl was allegedly raped by a girl on suspicion of love affair