६० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2015 13:11 IST2015-04-20T01:41:37+5:302015-04-20T13:11:26+5:30
आश्वी : शनिअमावस्येच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी मनोली (कांदळकर वस्ती) येथून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

६० हजारांचा ऐवज लंपास
आश्वी : शनिअमावस्येच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी मनोली (कांदळकर वस्ती) येथून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पुंजा म्हातारबा कांदळकर (कोल्हेवाडी रोड, मनोली) गावाच्या पश्चिमेस असलेल्या कांदळकर वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी शनिअमावस्येच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन घरात प्रवेश करत साखळी, अंगठी, डोरले, चांदीचे दागिने, पाच हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चोरीची घटना समजताच पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ मोरे, एकनाथ बर्वे हे घटनास्थळी भेट देऊन तपास करीत आहे. (वार्ताहर)