सेनेचे ६० आमदार उत्तर महाराष्ट्रात
By Admin | Updated: December 19, 2015 00:19 IST2015-12-19T00:19:10+5:302015-12-19T00:19:10+5:30
जळगाव : शेतकर्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल २० रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत.

सेनेचे ६० आमदार उत्तर महाराष्ट्रात
ज गाव : शेतकर्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेला राज्यातील सत्तेत भागिदार असलेल्या शिवसेनेचे ६० आमदार १९ व २० असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात आहेत. पहिल्या दिवशी निश्चित केलेल्या तालुक्यात हे आमदार जाऊन तेथील शेतकर्यांचे प्रश्न नोंदवून घेत आपला अहवाल २० रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करणार आहेत. शेतकर्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या शिवसेनेतर्फे राज्यातील विविध भागात जाऊन शासनाच्या योजनांचा शेतकर्यांना व तळागाळातील माणसाला कितपत लाभ मिळतो याचा ठरवून दिलेल्या तालुक्यात भेट देऊन अभ्यास करणार आहेत. १९ रोजी सकाळपासून हे आमदार दाखल होतील. यात जळगाव जिल्ात १८, नाशिक, २०, नंदुबार ९ व धुळे जिल्ात १३ आमदार जाणार आहेत. उत्तर महाराष्ट्राचा आढावाशिवसेना पक्षप्रमुख २० रोजी जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्रात शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल आमदारांकडून घेतील. अजिंठा विश्रामगृहात २० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात ते आमदारांशी संवाद साधतील. यानंतर जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर खान्देशातील जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्ातील आत्महत्या केलेल्या २२३ शेतकर्यांच्या वारसांना त्यांच्या हस्ते १० हजाराच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे.