शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील ६0 दशलक्ष मोबाइल सिम कार्ड ६ महिन्यांत होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:06 IST

रिलायन्स जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी किमान किमतीचे प्लान बाजारात आणले आहेत. यामुळे आता अनेकांना दोन-दोन सिम कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी किमान किमतीचे प्लान बाजारात आणले आहेत. यामुळे आता अनेकांना दोन-दोन सिम कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत अधिकचे सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड कमी होण्याची शक्यता आहे. त्यातून सुमारे ६0 दशलक्ष सिम कार्ड बंद होतील, असे दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.आॅगस्ट महिन्यातील मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात १.२ अब्ज मोबाइलचे वापरकर्ते आहेत. यापैकी केवळ एक सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या ७३0 ते ७५0 दशलक्ष इतकी आहे. उरलेल्या ग्राहकांकडे दोन-दोन सिम कार्ड आहेत.सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, बंद होऊ शकणारे आणि नव्याने दिले जाऊ शकणारे सिम कार्ड यांचा एकत्रित विचार केल्यास आगामी सहा महिन्यांत दूरसंचार कंपन्यांची ग्राहकसंख्या २५ ते ३0 दशलक्षांनी कमी होईल, असे मला वाटते.डेलॉइट इंडियाचे भागीदार हेमंत एम. जोशी यांनी सांगितले की, विविध कंपन्यांच्या प्लानमध्ये असलेला फरक आणि कंपनीकडून दिल्या जाणाºया सेवेचा दर्जा यांचा लाभ घेता यावा यासाठी लोक दोन-दोन सिम कार्ड वापरत असतात. आघाडीच्या तीन मोठ्या कंपन्यांचे दर आणि दर्जा आता समान झाल्यामुळे लोक एकच सिम कार्ड वापरण्यास प्राधान्य देतील, असा अंदाज आहे.आघाडीच्या कंपन्यांचे असे आहेत नवे प्लानभारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांनी ३५ रुपये, ६५ रुपये आणि ९५ रुपयांचे किमान रिचार्ज प्लॅन आणले आहेत. यांची वैधता २८ दिवसांची आहे. रिचार्ज न केल्यास ग्राहकाचे आऊटगोइंग एक महिन्यात बंद केले जाईल, तसेच इनकमिंग ४५ दिवसांत बंद केले जाईल. दोन्ही कंपन्यांचे हे किमान प्लान जिओच्या ४९ रुपयांच्या प्लॅनसारखेच आहेत. शिवाय कार्ड सुरू ठेवण्यासाठी किमान रिचार्जही बंधनकारक आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे एकच कार्ड ठेवणे भाग पडेल, असे जाणकारांना वाटते.

टॅग्स :Indiaभारत