बंगळुरमध्ये ६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: July 17, 2014 19:30 IST2014-07-17T16:08:35+5:302014-07-17T19:30:44+5:30

बंगळूरमधील एका नामांकित शाळेत अवघ्या ६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली.

6 year old girl raped in Bangalore | बंगळुरमध्ये ६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

बंगळुरमध्ये ६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

ऑनलाइन टीम 
बंगळूर, दि. १७ - बंगळूरमधील एका नामांकित शाळेत अवघ्या ६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. शाळा ही विद्येचे घर आणि सुरक्षित ठिकाण समजले जात असतानाच या संतापजनक घटनेने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  
बंगळूरमधील कुंदालाहल्ली गेटजवळ असलेल्या विबग्योर शाळेत ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी शाळेतील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पहिलीच्या वर्गात शिकणा-या ६ वर्षाच्या चिमुरडीवर दोन जणांनी बलात्कार केला असून यामध्ये जिम इंस्ट्रक्टर आणि एका सेक्यूरिटी गार्डचा समावेश आहे असा पोलिसांना संशय आहे. या शाळेत एकूण २७ जीम इंस्ट्रक्टर असून यामध्ये दोन संशयीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीची आई ही सॉफ्टवेअर इंजिनिअर (ओडीशा ) आहे. मुलीला सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचा जबाब घेतल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल अशी माहिती डीसीपी टी.डी. पवार यांनी दिली. 

 

Web Title: 6 year old girl raped in Bangalore