महेश कोलेलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सुमारे १ लाख २० हजारांपेक्षा अधिक प्रवासी वाहनांना व्हेईकल लोकेशन ट्रॅकींग डिव्हाइस (व्हीएलटी) आणि पॅनिक बटन बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही तरतूद करण्यात आली असून, याद्वारे जानेवारी ते नोव्हेंबर यादरम्यान ६ लाख ३० हजार २५९ अलर्ट आले आहेत. त्यापैकी एका महिलेने प्रवासादरम्यान दुचाकीस्वाराकडून त्रास दिल्याची तक्रार केल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. तर ४ ते ५ वेळा अपघातादरम्यान मदतीसाठी अलर्ट आल्याचे ते म्हणाले.
दिल्लीतील एका मुलीवर २०१२ रोजी चालत्या बसमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर देशभरातील सर्व प्रवासी वाहनांमध्ये व्हीएलटी आणि पॅनिक बटन अनिवार्य करण्यात आले.केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील तरतुदींना अनुसरून त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार राज्यातील वाहनांवर बसवण्यात आलेल्या या व्हीएलटी आणि पॅनिक बटणच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचे निरसन कारण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर १५ जानेवारी २०२५ पासून सुरू करण्यात आले.
वसई परिसरात कार्यालयातून घरी जात असताना काही दुचाकीस्वार त्रास देत असल्याच्या भीतीने एका महिला प्रवाशाने पॅनिक बटन दाबले होते. मात्र, संबंधित दुचाकीस्वार हे तिच्या कार्यालयातील मित्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहनामध्ये बसवण्यात आलेल्या व्हीएलटीमध्ये लोकेशन ट्रॅकर, रिअल-टाइम लोकेशन, स्पीड अलर्ट, जिओ-फेन्सिंग अशा गोष्टीची माहिती आरटीओला उपलब्ध होते.
कंट्रोल अँड कमांड सेंटरचे काम काय ?
अंधेरी आरटीओमध्ये असलेले कमांड अँड कंट्रोल सेंटर २४ तास सुरू असते. यासाठी मुंबईतील ४ आरटीओ कार्यालयांमधील सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची प्रत्येकी ८ तासांच्या शिफ्टमध्ये कार्यरत असतात. कमांड अँड कंट्रोल सेंटरमधील स्क्रीनवर अलर्ट आल्यावर तातडीने त्या वाहनाच्या ड्रायव्हरला संपर्क साधला जातो व प्रसंगाविषयी माहिती घेतली जाते.
ज्या प्रकरणांमध्ये महिलांची छेडछाड अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असल्याचे निदर्शनास येते, त्या प्रकरणात सहायक मोटार वाहन निरीक्षक हे वाहनाचे लाइव्ह लोकेशन, परवानाधारकाचे नाव व नंबर ही माहिती पोलिस विभागाकडे पाठवली जाते. त्यानंतर कारवाईकरून त्याचा रिपोर्ट आरटीओकडे पाठवण्यात येतो.
पॅनिक बटनद्वारे मिळालेले इशारे
महिना अलर्ट
जानेवारी ९,९५०फेब्रुवारी १६,९२४मार्च २४,४३९एप्रिल २९,८९९मे ३४,५७६जून ४६,८३३जुलै ७०,८७३ऑगस्ट ८७,४९७सप्टेंबर ९४,३०४ऑक्टोबर १,१३,४२०नोव्हेंबर १,०१,५४४
Web Summary : RTO's VLT system, installed in vehicles for safety, received 6.3 lakh alerts. Only one woman reported harassment. The system tracks location and speed, aiding emergency response.
Web Summary : आरटीओ के वीएलटी सिस्टम, सुरक्षा के लिए वाहनों में स्थापित, को 6.3 लाख अलर्ट मिले। केवल एक महिला ने उत्पीड़न की सूचना दी। सिस्टम स्थान और गति को ट्रैक करता है, जिससे आपातकालीन प्रतिक्रिया में मदद मिलती है।