येमेनमधील हवाई हल्ल्यात ६ भारतीयांचा मृत्यू

By Admin | Updated: September 11, 2015 16:07 IST2015-09-11T16:07:20+5:302015-09-11T16:07:41+5:30

सौदीतील येमेन येथील हवाई हल्ल्यात ६ भारतीय नागरिक ठार झाले असून त्यांचे मृतदेह मिळाल्याची माहिती पराराष्ट्र मंत्रालयातर्फे आज देण्यात आली.

6 Indians die in Yemen air raids | येमेनमधील हवाई हल्ल्यात ६ भारतीयांचा मृत्यू

येमेनमधील हवाई हल्ल्यात ६ भारतीयांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ -  सौदीतील येमेन येथील हवाई हल्ल्यात ६ भारतीय नागरिक ठार झाले असून त्यांचे मृतदेह मिळाल्याची माहिती पराराष्ट्र मंत्रालयातर्फे आज देण्यात आली आहे. 
मंगळवारी सौदी अरेबियाकडून येमेनमधील होदायदाह बंदरावरील तेल तस्करांवर हवाई हल्ले करण्यात आले तेव्हा २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त होते. मात्र ते वृत्त चुकीचे असल्याचे सांगत १३ नागरिक जिवंत व सुखरूप असून ७ जण बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले होते. बेपत्ता ७ नागरिकांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
अखेर काल, १० सप्टेंबर रोजी रात्री उशीरा त्या सहा भारतीयांचे मृतदेह सापडले असून ते मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, अशी माहिती पराराष्ट्र मंत्रालयातर्फे आज देण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी कळवण्यात आली असून त्या नागरिकांवर होदायदाह येथे अंत्यसंस्कार करण्याची अनुमती कुटुंबियांकडून घेण्यात आली आहे, असे स्वरूप यांनी सांगितले. मात्र आणखी एक नागरिक अद्याप बेपत्ता असून त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नसल्याचे समजते.   
 

Web Title: 6 Indians die in Yemen air raids