शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 23:44 IST

Omicron Variant : बुधवारी जोखमीच्या देशांतून 11 फ्लाइट्स भारतात दाखल झाल्या असून त्यामध्ये  6 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. 

नवी दिल्ली :  दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे भारतासह संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे.  दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियम लागू केले आहेत. दरम्यान, बुधवारी जोखमीच्या देशांतून 11 फ्लाइट्स भारतात दाखल झाल्या असून त्यामध्ये  6 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. 

देशात लखनौ वगळता विविध आंतरराष्ट्रीय विमानतळांवर 'जोखीम' असलेल्या देशांमधून मध्यरात्रीपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण 11 आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स दाखल झाल्या. या फ्लाइट्समध्ये एकूण  3476 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी केवळ 6 प्रवासी कोरोना बाधित आढळले. या कोरोना बाधित प्रवाशांचे नमुने संपूर्ण  जिनोम सिक्वेन्सिंगसाठी  INSACOG प्रयोगशाळेत पाठवले आहेत. 

'जोखीम' असलेल्या देशांच्या यादीतील देश30 नोव्हेंबरला अपटेड केलेल्या यादीनुसार, 'जोखीम' देशांमध्ये युरोपीय देश, यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे. या देशांतील प्रवाशांनी भारतात आल्यावर  RT-PCR चाचणीसह अतिरिक्त उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी 1 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी 14 दिवसांची प्रवासाची माहिती सादर करणे आणि कोरोना व्हायरसची निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आता बंधनकारक आहे. 

याचबरोबर, 'जोखीम' श्रेणीत येणाऱ्या देशांतील प्रवाशांना येथे आल्यावर कोरोना टेस्ट करावी लागेल आणि टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत विमानतळावर थांबावे लागेल. प्रवाशाची टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि आठव्या दिवशी त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. यावेळीही त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला पुढील सात दिवस स्वत:च्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जाईल.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या