दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी ६ समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 04:28 AM2017-11-23T04:28:58+5:302017-11-23T04:29:26+5:30

हिवाळ्यात दिल्ली व राजधानीच्या परिसरात अचानक वाढणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ६ समित्यांनी काम सुरू केले आहे.

6 committees to control pollution in Delhi | दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी ६ समित्या

दिल्लीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी ६ समित्या

Next

सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली : हिवाळ्यात दिल्ली व राजधानीच्या परिसरात अचानक वाढणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ६ समित्यांनी काम सुरू केले आहे. या समित्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन व समीक्षा थेट पंतप्रधान कार्यालयातर्फे सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
दोन वर्षांपासून हिवाळ्याच्या सुरूवातीस दिल्लीचे रूपांतर गॅस चेंबरमधे होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार ज्या ६ समित्यांनी आपले काम सुरू केले आहे, त्यात वन व पर्यावरण मंत्रालयाचे सचिव सी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रदूषणाच्या विविध कारणांचा शोध घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते आहे. आसपासच्या राज्यात विविध पिकांचे तण व खोडवा (पराली) जाळण्याला पर्याय शोधून काढण्याचे काम एका समितीवर सोपवण्यात आले आहे.

Web Title: 6 committees to control pollution in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.