शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 8:08 PM

सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने आज चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दहशतवाद्यांसह पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत.

नवी दिल्ली -  सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने आज चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दहशतवाद्यांसह पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, या कारवाईबाबत लष्करप्रमुख बीपीन रावत यांनी मोठी माहिती दिली आहे. लष्कराने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच सहा ते दहा पाकिस्तानी सैनिक आणि काही दहशतवादी ठार झाले आहेत, असे रावत यांनी सांगितले. रावत म्हणाले, ''अथमुकम, जुरा, कुंदलशाही या ठिकाणी असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांना लष्कराने लक्ष्य केले. आम्ही घुसखोरीला रोखण्यासाठी ही कारवाई केली. पाकिस्तान कसा खवळलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. तसेच बर्फवृष्टी होण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत.  आज सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरा दाखल मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये तोफांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.  यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला आहे. या कारवाईत कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर 22 हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. दरम्यान, भारतीय लष्काराच्या कारवाईनंतर केंद्र सरकार अलर्टवर असून संरक्षण मंत्रालय सुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे. या कारवाई संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत आहेत.   

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर