उमा नगरीत ५९ हजारांची घरफोडी
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
सोलापूर : मुरारजी पेठेतील उमा नगरीत राहणार्या सुमन सिद्राम आवताडे (वय ५०) यांचे घर फोडून चोरट्याने रोकड, दागिने असा ५८ हजार २०० रुपयांचा ऐवज पळवला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली.
उमा नगरीत ५९ हजारांची घरफोडी
सोलापूर : मुरारजी पेठेतील उमा नगरीत राहणार्या सुमन सिद्राम आवताडे (वय ५०) यांचे घर फोडून चोरट्याने रोकड, दागिने असा ५८ हजार २०० रुपयांचा ऐवज पळवला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली.सुमन आवताडे या घर बंद करून स्वामी समर्थांच्या पूजेसाठी मुलीच्या घरी गेल्या. ही संधी साधून चोरट्याने आतील लोखंडी कपाटातील ७०० रुपये आणि दागिने पळवले. शुक्रवारी सकाळी घरी आल्यानंतर सुमन आवताडे यांना घर फोडल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार खटाणे करीत आहेत.चोरीचा प्रयत्नमोदी येथील मोंढे ऑटोमोबाईल्स शोरुमच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. २८ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी पवन मोंढे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, तपास सपोनि बोधे करीत आहेत.पती-पत्नी, नोकरास मारहाणजागेचा ताबा घेण्यावरून गीता कुमार वेर्णेकर, तिचा पती आणि नोकरास मारहाण केल्याप्रकरणी राजकुमार हंचाटे, दत्तात्रय रचनभेरी, पीरसाब शेख, बागवान, बॉबी आणि इतर एक अशा सहा जणांवर विजापूर नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद नगरात हा प्रकार घडला. याप्रकरणी गीता वेर्णेकर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, तपास सपोनि उशिरे करीत आहेत.औद्योगिक वसाहतीत चोरीऔद्योगिक वसाहतीतील अनिल कलगोंडा पाटील यांच्या कारखान्यातून गुरुवारी रात्री साडेसात वाजता ११ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरट्याने पळवले. याप्रकरणी अनिल पाटील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार काशिद करीत आहेत.घरगुती गॅसचा बेकायदा वापरघरगुती गॅस रिक्षामध्ये भरत असताना सलीम रहिम शेख (रा. गवळी वस्ती, सोलापूर) यास पुरवठा निरीक्षक संध्या बाळासाहेब सोनवणे यांनी गुरुवारी दुपारी १ वाजता रंगेहाथ पकडले. त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सलीम शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास महिला सपोनि शेख करीत आहेत.