शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:23 IST

Gujarat Crime News: एका ५९ वर्षीय व्यावसायिकाचा गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवतानाचा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजमधून रेकॉर्ड करून दुकानदाराने त्याला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एका ५९ वर्षीय व्यावसायिकाचा गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवतानाचा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजमधून रेकॉर्ड करून दुकानदाराने त्याला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील जामनगर येथे उघडकीस आला आहे. येथील एक ५९ वर्षीय व्यावसायिक त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन ड्रायफ्रूट्सच्या दुकानात गेला होता. तिथे त्याने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवलं. हे दृष्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. त्यानंतर याचा व्हिडीओ चित्रित करून घेत दुकानदार आणि त्याच्या सहकाऱ्याने या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच पहिल्यांदा त्याच्याकडून ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर पुन्हा एकदा पैशांची मागणी केली. मात्र हे पैसे न दिल्याने या दुकानदाराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. तसेच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दुकानदार आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना जामनगरमधील सुभााष मार्केट परिसरातील आहे. येथे एक व्यावसायिक त्याच्या मैत्रिणीसोबत खरेदी करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्यांनी एकमेकांना चॉकलेट भरवली. हे दृश्य दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले होते. तसेच त्यालाच हत्यार बनवून दुकानदार अब्दुल सत्तार उर्फ अबू कसम लखानी आणि त्याचा सहकारी समीर रावकरदा यांनी या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

त्यांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडूव ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली. यावेळी त्यांनी एक लाख रुपये मागितले. मात्र ही रक्कम त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकारामुळे सदर व्यावसायिकाला बदनामीला सामोरं जावं लागलं. अखेरीस या व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपी दुकानदाराला अटक केली. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात