शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

ईडीच्या १७ वर्षांत ५८७१ धाडी; २००५ ते २०२२ दरम्यानची कारवाई, २३ जण दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:42 IST

हवाला, विदेशी चलन अंतर्गत छापे

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हवाला व्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) आणि विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यातील (एफईएमए-फेमा) तरतुदीनुसार एक एप्रिल, २०११ ते ३१ मार्च, २०२० कालावधीत अनुक्रमे १७५८ व १०२७ छापे घातले व तपास सुरू केला. पीएमएलएअंतर्गत ईसीआयआरची नोंद झालेली संंख्या १९९९, तर फेमाअंतर्गत १८००३ प्रकरणांत तपास सुरू करण्यात आला आहे.पीएमएलए १ जुलै, २००५ पासून अमलात आला आहे. २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी ९४३ प्रकरणांत प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस दाखल झाल्या असून त्या खटल्याच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर आहेत. १५ मार्च, २०२२ रोजी पीएमएलएअंतर्गत ट्रायल कोर्टसनी २३ आरोपींना हवाला व्यवहारांत दोषी ठरवले आणि केवळ एका प्रकरणात आरोपीची गुणवत्तेच्या आधारावर सुटका झाली आहे.हवाला व्यवहारांचा तपास करताना पुरावे गोळा करण्यासाठी छापे खूप महत्त्वाचे आहेत. हवाला व्यवहारांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार किती गंभीर आहे हे छाप्यांच्या वाढत्या संख्येवरून दिसते. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून, दोन संस्थांमध्ये सहकार्य आणि माहितीची देवाण-घेवाण करून आर्थिक गुप्त माहिती गोळा करण्यातील सरकारची बांधीलकी दिसते. देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रलंबित असलेल्या जुन्या प्रकरणांचा आणि गुंतागुंतीच्या हवाला व्यवहार प्रकरणांचा तपास करण्यासाठी सुनियोजितपणे प्रयत्न करण्यात आले. या सगळ्या प्रकरणांत अनेक आरोपी असल्यामुळे छाप्यांची संख्या वाढणार होती. छाप्यांचे प्रमाण वाढण्यामागे जी कारणे होती त्यापैकी हे एक होते.घातलेले छापे, ईसीआयआरची नोंदणी, दाखल झालेल्या प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस आणि पीएमएलएअंतर्गत ठरलेले दोषी खालीलप्रमाणे.कालावधी         घातलेले छापे    ईसीआयआरची झालेली नोंद   दाखल तक्रारी    दोषी            ०१-०७-२००५       ३०८६                    ४९६४                                ९४३                 २३ते २८-०२-२०२२         कोट्यवधी रुपये केले जप्त२००४-१४ दरम्यान ११२ छाप्यांची कारवाई करण्यात आली. त्यातून गुन्ह्यांतील ५,३४६.१६ कोटी रुपये जप्त करण्यात आले व १०४ प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस दाखल करण्यात आल्या. २०१४-२२ दरम्यान २९७४ छापे घालण्यात  आले. यातून गुन्ह्यातील ९५,४३२.०८ कोटी रुपये जप्त करण्यात येऊन ८३९ प्रोस्युक्यूशन कम्प्लेंटस दाखल करण्यात आल्या.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय