शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी’ मध्ये 5़74 कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

निधी परत द्या : ‘जलयुक्त’चा निधी वळविल्यामुळे जि़प़ सदस्य आक्रमक

निधी परत द्या : ‘जलयुक्त’चा निधी वळविल्यामुळे जि़प़ सदस्य आक्रमक
सोलापूर: जिल्हा नियोजन समितीमधून 5 कोटी 74 लाख 90 हजारांच्या निधीतून विविध प्रकारची 11 कामे करण्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ विनाचर्चा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला़ जलयुक्त शिवार अभियानासाठी शासनाकडून डीपीसीमार्फत आलेल्या 46 कोटींच्या निधीवरुन बराच गोंधळ झाला़ जि़प़ला 9 कोटी परत करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली; मात्र आता निधी देता येणार नाही़ नियमानुसार तो वर्ग केला असल्याचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितल़े
जिल्हा नियोजन समितीची या वर्षातील दुसरी बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती़ यावेळी आमदार, खासदार तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी होत़े मंद्रुपच्या सीताबाई तलावातून गाळ काढण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून पाच कोटींची तरतूद करावी तसेच विविध समाजाच्या स्मशानभूमी एकत्र केल्यास त्या गावांना नावीन्यपूर्ण योजनेतून बक्षीस देण्याची सूचना आ़ सुभाष देशमुख यांनी मांडली; मात्र ती मंजूर झाली नाही़ जिल्हा परिषदेला जनसुविधे अंतर्गत स्मशानभूमी तसेच दफनशेड बांधण्यासाठी 15़72 कोटींचा निधी मंजूर असून त्यातून 191 ठिकाणी ही कामे करण्यास मंजुरी देण्यात आली़ ज्या गावात जागा मिळत नाही त्या ठिकाणी पुन्हा नव्या गावांचा समावेश करु असा निर्णय झाला़
जलयुक्त शिवार अभियानासाठी हेड नसल्यामुळे शासनाने हा निधी डीपीसीमध्ये अतिरिक्त निधी म्हणून पाठविला आह़े त्यामुळे जि़प़च्या हिश्याचा सोडून अतिरिक्त निधी जिल्हाधिकार्‍यांनी पत्र पाठवून परत घेतला यामध्ये जि़प़चे 26 कोटी आहेत़ यात लघुपाटबंधारेचे 9 कोटी आहेत त्यामुळे हा निधी जि़प़ला परत करा़ डीपीसीच्या बैठकीशिवाय हा निधी वर्ग कसा केला असे मुद्दे गणपतराव देशमुख यांच्यासह जि़प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड, शिवाजी कांबळे, सुरेश हसापुरे यांच्यासह जि़प़ सदस्यांनी उपस्थित केल़े जि़प़चा कोणताही निधी कपात केला नाही़ जास्त निधी आला होता तो जलयुक्तसाठी विविध कामांसाठी वापरण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितल़े जि़प़ला 2 कोटी तर निधी द्या असे म्हटल्यावर पुनर्नियोजनामध्ये देऊ असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल़े
नावीन्यपूर्ण योजनेतून होणारी कामे-
-जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कक्ष बांधणे (11़76 लाख), जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वागत कक्ष, अभ्यासकक्ष, पिण्याची टाकी बांधणे (51़74 लाख), उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सीजन जनरेशन गॅस स्थापित करणे (3 कोटी), पोलीस आयुक्तालयात स्वागत कक्ष करणे (10 लाख), पोलीस अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही बसविणे (12़10 लाख), बाल मृत्यू, स्वाईन फ्लू, विषप्रशासन केलेल्या रुग्णांना उपचार करणे, व्हेटींलेटर खरेदी करणे (1 कोटी), सिव्हिल हॉस्पिटल येथे व्हेंटीलेटर 2 नग (23़30 लाख), जिल्हा क्रीडा कार्यालय कुस्ती मॅट खरेदी करणे (20 लाख), शहरात वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे (15 लाख), जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे (10 लाख) या कामांना निधी मंजूर करण्यात आला़


बैठकीतील निर्णय-
-191 गावात जनसुविधा अंतर्गत शेड उभारण्यासाठी 15़72 कोटींच्या कामांना मंजुरी
-नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत 5़74 कोटीतून 11 कामे करण्यास मंजुरी.
-जलयुक्त शिवारमधील 46 कोटींचा निधी डीपीसीच्या हेडवर आला तो डीपीसीचा निधी नाही.
-जिल्हा परिषदेचा 9 कोटींचा निधी परत देता येणार नसल्याची जिल्हाधिकार्‍यांची भूमिका.