कन्नडजवळ ५६ लाख जप्त
By Admin | Updated: September 22, 2014 02:14 IST2014-09-22T02:14:36+5:302014-09-22T02:14:36+5:30
कन्नड सोयगाव मतदारसंघातील पाणपोई फाट्यावर तपासणी पथकाने रविवारी दुपारी ५६ लाख रुपये जप्त केले.ही रक्कम कन्नड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.

कन्नडजवळ ५६ लाख जप्त
कन्नड (जि. औरंगाबाद) : कन्नड सोयगाव मतदारसंघातील पाणपोई फाट्यावर तपासणी पथकाने रविवारी दुपारी ५६ लाख रुपये जप्त केले. ही रक्कम कन्नड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
याप्रकरणी अमरसिंग अरविंदसिंग (३३), शंकरसिंग वीरबहादूरसिंग (२२, रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याचे तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थिर पथकातील अब्दुल वहीद, एल. डी. गिरी, एस. आर. सोनवणे, मुनीर शेख, शुभम् डहाळे, शिवदास सोनवणे यांचे पथक पाणपोई फाट्यावर तपासणी करीत असताना कन्नडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या जीप (क्र. डीएल-६, सीएम- ७७१९) मध्ये ही रोख रक्कम आढळली. गाडीच्या डिकीत ठेवलेले ५६ लाख रुपये अधिकाऱ्यांनी जप्त केले.