शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:32 IST

Corona Virus in Maharashtra: महाराष्ट्रात काल 17864 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. जावडेकर यांचे ट्विट अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

देशात कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. मात्र, महाराष्ट्रात देशाच्या निम्म्याहून अधिक कोरोनाबाधित सापडू (Corona patient incresed in Maharashtra.) लागल्याने आता केंद्र विरोधात राज्य सरकार असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. पुणे, ठाण्यात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागल्याचे वृत्त आले होते. या वाढत्या रुग्णसंख्येवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javdekar) यांनी महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) मोठा आरोप लावला आहे. (Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. )

महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ 44 टक्केच लसीचे लसीकरण झाले आहे. तर 56 टक्के लस पडून कशी राहिली असा सवाल केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राने12 मार्चपर्यंत 23 लाख लसींचाच वापर केला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला एकूण 54 लाख लसी देण्यात आल्या होत्या.  याचाच अर्थ 56 टक्के लसींचा साठा वापरलाच नाहीय, असा आरोप केला आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस शिल्लक असताना शिवसेनेचे खासदार राज्याला आणखी अतिरिक्त लस हवी अशी मागणी करत आहेत. आधी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी गडबड-गोंधळ केला आता लसीकरणामध्येही तेच घडत आहे, असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. जावडेकर यांचे ट्विट अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. 

मंगळवारीच केंद्राने झापलेले... महाराष्ट्रात काल 17864 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची ही चिन्हे आहेत, सबब लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. त्या पाहणीच्या आधारावरच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे.

१२,७४,००० डोस मिळणार -महाराष्ट्राला १८ मार्चपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२,७४,००० डोस प्राप्त होणार आहेत. राज्यात लसींचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचेही राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या’कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस