५२ हजारांचा सुगंधित तंबाखू पकडला
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:11+5:302015-09-01T21:38:11+5:30
(फोटो)

५२ हजारांचा सुगंधित तंबाखू पकडला
(फ ोटो)५२ हजारांचा सुगंधित तंबाखू पकडलाअडीच लाखांचा ऐवज जप्त : जलालखेडा पोलिसांची कारवाईनरखेड : तालुक्यातील जलालखेडा पोलिसांनी जलालखेडा-मोवाड मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये कार आणि ५२ हजार ५०० रुपये सुगंधित तंबाखूसह एकूण २ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात कारचालकास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी दुपारी ३.१० ते ३. ५० वाजताच्या दरम्यान करण्यात आली. हितेश कृष्णा फलके (३०, रा. नागपूूर) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. मोवाड-जलालखेडा मार्गावरून कारमध्ये सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती जलालखेडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-३१/सीएम-२४५८ क्रमांकाच्या कारमध्ये विविध कंपन्यांचा एक क्विंटल सुगंधित तंबाखू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कारचालक हितेशला ताब्यात घेत कार व तंबाखू जप्त केला. या कारवाईमध्ये ५२ हजार ५०० रुपये किमतीच्या तंबाखूसह एकूण २ लाख ५२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी जलालखेडा पेालिसांनी अन्न व सुरक्षा मानके कायदा सहकलम २६ (३), ३० (२) अ तसेच भादंवि १८८, २७३ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, उपनिरीक्षक विजय कोरडे, अशोक गाढवे, श्रीवास वाघ, किशोर लोही, अशोक देशमुख आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)***