कुत्र्याच्या लग्नाला 5000 निमंत्रक
By Admin | Updated: March 12, 2016 16:21 IST2016-03-12T16:21:23+5:302016-03-12T16:21:23+5:30
कौशंभी जिल्ह्यात चक्क कुत्र्याचा विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नाला एक दोन नव्हे चक्क 5000 लोकांनी उपस्थिती लावली असल्याची आगळीवेगळी घटना पावरा गावात घडली आहे

कुत्र्याच्या लग्नाला 5000 निमंत्रक
ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. १२ - कौशंभी जिल्ह्यात चक्क कुत्र्याचा विवाहसोहळा पार पडला आहे. या लग्नाला एक दोन नव्हे चक्क 5000 लोकांनी उपस्थिती लावली असल्याची आगळीवेगळी घटना पावरा गावात घडली आहे.
या आगळ्यावेगळ्या लग्नाच्या पत्रिकादेखील छापण्यात आल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट महणजे हे लग्न पुर्ण हिंदू परंपरेप्रमाणे करण्यात आलं. लग्नाला येताना लोकांनीदेखील डिजेच्या गाण्यांवर ताल धरला आणि धिंगाणा घातला. लग्नामध्ये आलेल्या लोकांसाठी जेवणाचीदेखील सोय करण्यात आली होती. एखाद्या साध्या लग्नात ज्याप्रमाणे जेवण असत ते सर्व पदार्थ या जेवणात ठेवण्यात आले होते.
Big fat "dog wedding" held in Kaushambi (UP), 5k people in attendance; complete with ceremonies & tearful send off.https://t.co/mpGTyRfCjO
— ANI (@ANI_news) March 12, 2016