शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन कोरोनात दिल्लीत एम्सच्या ५ हजार नर्स संपावर; काय आहेत मागण्या?

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 14:21 IST

संपावर गेलेल्या नर्स आणि वॉर्ड बॉय यांच्या मागण्याची यादी खूप मोठी आहे. यात ६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे.

दिल्लीराजधानी दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील तब्बल ५ हजार नर्स संपावर गेल्या आहेत. यात महिला आणि पुरूष अशा दोन्ही कामगारांचा समावेश आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. ऐन कोरोनाच्या काळात कर्मचारी संपावर गेल्याने रुग्णांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. रुग्णांना समस्यांना तोंड द्यावं लागत असून त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणी नसल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, ओपीडी आणि आपत्कालीन वॉर्डात अद्याप याचा परिणाम झालेला नाही. पण कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्यास संपूर्ण रुग्णालय प्रशासन व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. 

संपावर गेलेल्या नर्स आणि वॉर्ड बॉय यांच्या मागण्याची यादी खूप मोठी आहे. यात ६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. या त्रृटी दूर झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनात वाढ होईल. राहण्याची व्यवस्था, कंत्राटी पद्धतीनं केली जाणारी नियुक्ती थांबवणं अशाही काही मुख्य मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. 

६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करासंपावर गेलेल्या नर्स आणि वॉर्ड बॉय यांची मुख्य मागणी ६ व्या वेतन आयोगातील त्रृटी दूर करण्याची आहे. त्यामुळे मासिक मानधनात वाढ होईल, असं संपकऱ्यांचं म्हणणं आहे. कर्मचारी संघटनांनी एकूण २३ मागण्या केल्या होत्या आणि एम्सचे व्यवस्थापक, सरकारने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत, अशी माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिली.

कंत्राटी पद्धत बंद कराकंत्राटी पद्धतीने नर्सेसची भरती करणं बंद व्हायला हवं अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या जे कंत्राट पद्धतीने कामावर आहेत त्यांना कायमस्वरुपी करुन घ्यावं अशीही मागणी करण्यात आली आहे. 

नर्सिंग सुविधांचे आऊटसोर्सिंग बंद करादिल्लीतील एम्सच्या नर्स यांनी रुग्णालयातील नर्सिंग सुविधांचे आऊटसोर्सिंग बंद करण्याचीही मागणी केली आहे. रुग्णालयातील रुग्णांना बाहेरच्या कंपनीच्या भरवशावर सोडून देणं योग्य नाही, अशी नर्सेस संघटनेचं म्हणणं आहे. सध्या नर्सेस संपावर असतानाही रुग्णालय प्रशासनाने बाहेरुन कर्मचारी मागवले असल्याचंही कर्मचारी संघटनेने सांगितलं. 

राहण्याची व्यवस्थारुग्णालयात विविध शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी नर्सेस ठेवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था देखील रुग्णालयाने करायला हवी, अशी मागणी नर्सेसने केली आहे. 

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्ली