शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

500 बेपत्ता मुलांना मिळाला जगण्याचा 'आधार'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 10:24 IST

आधारच्या माध्यमातून 500 बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी ही माहिती सार्वजनिक केली आहे.

नवी दिल्ली- सर्व व्यवहार एका बटनावर आणण्याचे प्रयत्न असल्यानं मोबाईल, बँक खाती आधारशी जोडण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. आधारच्या या सक्तीला अनेकांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत. परंतु याच आधारच्या माध्यमातून 500 बेपत्ता मुलांचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी हे सार्वजनिक केलं आहे. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबरस्पेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.काही बेपत्ता झालेली मुलं अनाथाश्रमात होती. मात्र ज्यावेळी ती मुलं आधार नोंदणीसाठी गेली, त्यावेळी त्यांचा 12 अंकी बायोमेट्रिक क्रमांक आधीच अस्तित्वात असल्याचं समोर आलं. त्यामुळे या मुलांच्या कुटुंबीयांचा थांगपत्ता लावणं सहज शक्य झालं, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे. हरवलेली मुलं अनेक वर्षांनी त्यांच्या कुटुंबीयांना आधारमुळेच भेटल्याचं भूषण पांडे यांनी सांगितलं आहे.भारतातल्या लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या 18 वर्षांखालील मुलांची आहे. लहानग्यांसाठी कार्यरत असलेल्या क्राय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशात हरवलेल्या आणि बेपत्ता असणाऱ्या मुलांचे प्रमाण 2013-15 या दोन वर्षांच्या काळात 84 टक्के वाढले होते. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, दर दिवशी सरासरी 180 मुलं बेपत्ता होतात. विविध सरकारी योजनांना आधार जोडणी केल्यामुळे यंत्रणांमधून बनावट नावे काढली गेली असून, त्यामुळे आतापर्यंत १० अब्ज डॉलरची बचत झाली आहे, अशी माहितीही पांडे यांनी दिली. देशात 99 टक्के तरुणांकडे आधार कार्ड असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डbankबँकIndiaभारत