बार्शीत बनावट ५० हजार रुपये जप्त

By Admin | Updated: July 7, 2015 01:05 IST2015-07-07T01:05:34+5:302015-07-07T01:05:34+5:30

बार्शी : शहरात लता चित्रमंदिराच्या परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी तिघांना पकडून त्यांच्याजवळील ५० हजार रुपये हस्तगत केले़

50 thousand rupees fabricated in barshi seized | बार्शीत बनावट ५० हजार रुपये जप्त

बार्शीत बनावट ५० हजार रुपये जप्त

र्शी : शहरात लता चित्रमंदिराच्या परिसरात ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी तिघांना पकडून त्यांच्याजवळील ५० हजार रुपये हस्तगत केले़
बनावट नोटांच्या व्यवहाराबाबत पोलिसांना खबर मिळाली होती़ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लता चित्रमंदिराच्या परिसरात सोमवारी रात्री सापळा रचला़ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चहा टपरी चालक संतोष मुरलीधर पिस्के (वय २९, रा़ राऊळ गल्ली) हा ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन लता चित्रमंदिर परिसरात आला़ सुरेश दगडू चव्हाण (रा़ गुळमेवस्ती, बार्शी) आणि प्रेमा दत्तात्रय चव्हाण (रा़ पंकजनगर) या दोन साथीदारांना या नोटा देत असताना पोलिसांनी त्यांना पकडले़ पाचशे रुपयांच्या शंभर नोटा जप्त करुन पोलिसांनी स्टेट बँकेमध्ये मशीनवर बनावट असल्याबाबत खात्री करुन घेतली आणि गुन्हा दाखल केला़
सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, अतुल भोस, कॉन्स्टेबल देवकर, सय्यद, आदलिंगे, शेख, राठोड, घंटे यांनी या कामगिरीत सहभाग नोंदवला़ (प्रतिनिधी)

Web Title: 50 thousand rupees fabricated in barshi seized