एपी एक्स्प्रेसमधून ५० हजाराचा मुद्देमाल लंपास
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:12+5:302015-01-23T01:05:12+5:30
एपी एक्स्प्रेसमधून ५० हजाराचा मुद्देमाल लंपास

एपी एक्स्प्रेसमधून ५० हजाराचा मुद्देमाल लंपास
ए ी एक्स्प्रेसमधून ५० हजाराचा मुद्देमाल लंपासनागपूर : एपी एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा लॅपटॉपसह ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सागर बाळकृष्ण पाठराबे (३५) रा. प्लॉट क्रमांक ३, दुसरा माळा त्र्यंबकेश्वर अपार्र्टमेंट, तुळशीबाग महाल हे रेल्वेगाडी क्रमांक १२७२४ एपी एक्स्प्रेसने (कोच बी-१, बर्थ ५४) झाशी ते नागपूर असा प्रवास करीत होते. भोपाळ येथे गाडी आल्यानंतर त्यांना बर्थखाली ठेवलेली लॅपटॉपची बॅग दिसली नाही. त्यांनी बॅगचा शोध घेतला असता ती कुठेच आढळली नाही. त्यांच्या शेजारी ५५ क्रमांकाच्या बर्थवर प्रवास करीत असलेला प्रवासीही तेथून निघून गेला होता. त्यामुळे त्याच प्रवाशाने आपली बॅग पळविली असावी, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे. त्यांच्या बॅगमध्ये ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, ३२०० रुपये रोख, ६ हजार रुपये किमतीची हार्ड डिस्क असा एकूण ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल होता. (प्रतिनिधी).................