भाजपा उमेदवाराच्या गाडीत ५० लाख

By Admin | Updated: October 10, 2014 06:09 IST2014-10-10T06:02:27+5:302014-10-10T06:09:58+5:30

बोरीवलीत नाकाबंदी सुरु असताना सुधीर फडके उद्यानाजवळ गुरुवारी संध्याकाळी जीपमधील पन्नास लाखांची रोकड भरारी पथकाने जप्त केली

50 lakhs for BJP candidate's car | भाजपा उमेदवाराच्या गाडीत ५० लाख

भाजपा उमेदवाराच्या गाडीत ५० लाख

मुंबई : बोरीवलीत नाकाबंदी सुरु असताना सुधीर फडके उद्यानाजवळ गुरुवारी संध्याकाळी जीपमधील पन्नास लाखांची रोकड भरारी पथकाने जप्त केली. ही रक्कम दहिसर मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी यांच्या गाडीत सापडली आहे. त्यांचा चालक रक्कमेसह गाडी घेऊन येत होता. ही रोकड पोलीस ठाण्यात जमा केली आहे. या प्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिक तपास करत आहेत. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता.

विरोधकांचा कट...

भाजपाच्या दादर कार्यालयातूून उत्तर मुंबईच्या खर्चाकरिता ही रक्कमपाठविण्यात आली होती. ही पक्षाची अधिकृत रक्कम असून ती जनकल्याण बँकेतून काढण्याचा पुरावा आहे. तसेच ही रक्कम ५० लाखांची नसून फक्त १५ लाखांची आहे. त्याची पावती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहे, असे मनीषा चौधरी यांनी सांगितले. विरोधक असलेल्या विनोद घोसाळकरांनी हे मुद्दाम घडवल्याचा आरोपही चौधरी यांनी केला.

Web Title: 50 lakhs for BJP candidate's car