आझम खान यांची जीभ कापणाऱ्यास ५0 लाखांचे बक्षीस
By Admin | Updated: July 2, 2017 00:38 IST2017-07-02T00:38:43+5:302017-07-02T00:38:43+5:30
भारतीय जवानांबद्दल केलेल्या विधानांमुळे वादात सापडलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची जीभ कापणाऱ्याला

आझम खान यांची जीभ कापणाऱ्यास ५0 लाखांचे बक्षीस
शाहजहाँपूर : भारतीय जवानांबद्दल केलेल्या विधानांमुळे वादात सापडलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची जीभ कापणाऱ्याला विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने ५0 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. आझम खान यांनी जवानांविषयी केलेल्या विधानांमुळे त्यांच्याविरुद्ध दोन पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे. आता शाहजहाँपूरमधील विहिंपचे जिल्हा समन्वयक राजेशकुमार अवस्ती यांनी आझम यांची जीभ आणणाऱ्यास आपण ५0 लाख रुपये देऊ, असे जाहीर केले आहे. अवस्ती यांनी शाहजहाँपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खान यांचा पुतळा जाळून निषेध केला. (वृत्तसंस्था)