भोपाळमध्ये बोट बुडून 5 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: March 21, 2016 08:53 IST2016-03-21T08:53:10+5:302016-03-21T08:53:10+5:30

मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तलावात बोट बुडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे

5 people lost their lives in Bhopal | भोपाळमध्ये बोट बुडून 5 जणांचा मृत्यू

भोपाळमध्ये बोट बुडून 5 जणांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत - 
भोपाळ, दि. २१ - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तलावात बोट बुडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण दहा जण बोटीमधून प्रवास करत होते. पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. रात्री बोट बुडाल्याने रात्रभर अंधारात बचावकार्य सुरु होतं. 
 
बोटीतून प्रवास करणारे सर्वजण तलावाजवळीच भोईपुरा परिसरातील रहिवासी आहेत. रात्री 9 ते 9.30 दरम्यान ही घटना घडली. ही बोट चोरुन आणल्याची माहिती मिळाली आहे. तसंच बोटीवर असणा-यांनी मद्यप्राशन केल्याने त्यांचा तोल सुटला अशीदेखील माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. 
 
या तलावात संध्याकाळी 6 नंतर जाण्यास बंदी आहे. बंदी असतानादेखील ही मुलं तलावात कशी केली ? कोणी यांना रोखलं का नाही ? याचा पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: 5 people lost their lives in Bhopal