दिप्ती शर्मा अपहरण प्रकरणी 5 जण अटकेत
By Admin | Updated: February 15, 2016 13:26 IST2016-02-15T13:26:57+5:302016-02-15T13:26:57+5:30
स्नॅपडीलची कर्मचारी दिप्ती शर्माच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे.

दिप्ती शर्मा अपहरण प्रकरणी 5 जण अटकेत
ऑनलाइन लोकमत
गाजियाबाद, दि.15 - स्नॅपडीलची कर्मचारी दिप्ती शर्माच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना अटक केली आहे. कामावरुन घरी परतताना रिक्षामधून काही अज्ञातांनी दिप्ती शर्माच अपहरण केलं होतं त्यानंतर 2 दिवसांनी दिप्ती सुखरुप घऱी परतली होती.
दिप्ती शर्मा घरी परतल्यानंतर पोलिसांनी दिप्तीचा जबाब नोंदवला होता ज्यामध्ये चाकूच्या धाकावर अपहरण केल्याचं दिप्तीने सांगितल होतं मात्र डोळ्यावर पट्टी बांधण्यात आल्याने आरोपींना ती पाहू शकली नव्हती. दिप्तीच्या अपहरणात जवळचाच कोणीतरी असल्याचा संशय पोलिसांना होता त्याप्रमाणे त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. अखेर पोलिसांनी 5 जणांना अटक केलीये मात्र त्यांची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाहीये