शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विचित्र प्रकार; एकाच वेळी आजारी पडले सात जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:59 IST

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात पाच प्रवाशांसह सात जण अचानक आजारी पडल्याची घटना घडली.

Air India Plane: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. अशातच लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात काही प्रवाशांची आणि क्रू मेंबर्सची प्रकृती अचानक बिघडली. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांना त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना सोडून दिलं. या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. प्रवाशांची तब्येत बिघडल्यानंतरही बोईंग ७७७ विमानाने आपला प्रवास सुरू ठेवला आणि ते मुंबईत सुरक्षितपणे उतरले.

लंडनच्या हीथ्रो विमानतळावरून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १३० विमानामध्ये प्रवासादरम्यान, पाच प्रवाशांनी आणि दोन क्रू मेंबर्सनी चक्कर येणे आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती. एअर इंडियाने सोमवारी ही माहिती दिली. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले तेव्हा वैद्यकीय पथक आधीच तयार असल्याचे एअर इंडियाने सांगितले. मुंबईत पोहोचल्यानंतर, दोन प्रवाशांना आणि दोन क्रू मेंबर्सना मेडिकल रूममध्ये नेण्यात आले जिथे त्यांची तपासणी करण्यात आली. नंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि तपास यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.

"विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आहे. आमच्या वैद्यकीय पथकाने प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना तात्काळ मदत केली. लँडिंगनंतरही २ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सना अस्वस्थ वाटत होते. त्यांना मेडिकल रूममध्ये नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत," असं एअर इंडियाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सोमवारी, एअर इंडिया एक्सप्रेसचे दिल्ली-जम्मू-श्रीनगर विमान जम्मू विमानतळावर न उतरताच दिल्लीला परतले. विमान सकाळी १०:४० वाजता निघणार होते. पण विमानाने सकाळी ११:०४ वाजता उड्डाण केले होते आणि दुपारी १२:०५ वाजता जम्मूला पोहोचणार होते. मात्र उड्डाणादरम्यान संशयास्पद जीपीएस समस्येमुळे विमान परत आणण्यात आले आणि दिल्लीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे, एअर इंडिया एक्सप्रेसच्या जयपूर ते दुबई या विमानात उड्डाण करण्यापूर्वी कॉकपिटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर, पायलटने विमान धावपट्टीवरून पुन्हा विमानतळाकडे आणले. विमानात १३० प्रवासी होते. ५ तास विमान दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू राहिले. तरीही यश आले नाही. त्यानंतर, दुबईला जाणारे हे विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाLondonलंडन