शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत श्रीराम लाट! पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले,गर्दीमुळे वाहनांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 07:54 IST

सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी पहिल्याच दिवशी नवं रेकॉर्ड बनले आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे, यामुळे प्रशासनाने शहरात वाहनांनवर बंदीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 

रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे, यामुळे प्रशासनाला  सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज होती. यादरम्यान काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम लखनौ येथूनच लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला.

मस्तकावर हिरे-माणकांचा टिळा, भव्य, दिव्य आणि अलौकिक आहे रामललांचा श्रृंगार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आढावा घेतला

उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी मंदिराजवळ नियोजनासाठी तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भाविकांच्या सोयीसाठी आठ ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची ही गर्दी पाहता सीएम योगी यांनी स्वत: लखनऊ येथून लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे गर्दीची पाहणी केली. अयोध्येतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही दिवस येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. गाड्यांसाठी केलेले सर्व ऑनलाइन बुकिंगही रद्द करण्यात आले असून, भाविकांच्या बसेसचे पैसे परत केले जाणार आहेत. रामललाच्या दर्शनासाठी भाविकांचा मोठा जमाव अयोध्येत पोहोचला तेव्हा प्रधान सचिव संजय प्रसाद आणि कायदा व सुव्यवस्था महासंचालक प्रशांत कुमार स्वतः गर्भगृहात उपस्थित होते. त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या