देशभरात ५ करोड वाहन परवाने बनावट, दोषीवर होणार कडक कारवाई
By Admin | Updated: May 29, 2016 15:22 IST2016-05-29T15:22:57+5:302016-05-29T15:22:57+5:30
भारतात साधरणता प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचे वाहन परवाना बनावट असण्याची शक्यता आहे. कारण मिळालेल्या आकडीवारीनुसार रस्त्यावर जे लोग वाहन चालवतात त्यांच्यापैकी ५ करोट लांकाचे वाहन परवाने बनावट आहेत.

देशभरात ५ करोड वाहन परवाने बनावट, दोषीवर होणार कडक कारवाई
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ : भारतात साधरणता प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचे वाहन परवाना (ड्राइविंग लाइसेंस) बनावट असण्याची शक्यता आहे. कारण मिळालेल्या आकडीवारीनुसार रस्त्यावर जे लोग वाहन चालवतात त्यांच्यापैकी ५ करोट लांकाचे वाहन परवाने बनावट आहेत. बनावट परवान्या सोबत गाडी चालवणाऱ्या चालकास एक वर्ष जेल आणि १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा नवीन कायदा करण्यातआला आहे. सध्याच्या नियमानुसार बनावट परवान्यानुसार गाडी चालवणाऱ्यास ३ महीने जेल आणि ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
१८ वर्षवयाखालील वाहन चालक असल्यास त्याच्या पालकास ३ वर्षाचा कारावास आणि २०,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे गाडीचं रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात येणार आहे. देशभरात वाहन चालविण्याचे सुमारे ३० टक्के परवाने चुकीच्या पद्धतीने दिले गेले असून, ते बनावट आहेत. परवाना पद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासह अपघातांना प्रतिबंध करण्याकरीचा केंद्र सरकार लवकरच विधेयक आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते शनिवारी नागपुरच्या ट्रामा केअर इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
अनेक राज्यांत वाहन चालवण्याचे परवाने देण्याच्या पद्धतीच सदोष आहेत. बऱ्याच नागरिकांना घरबसल्या वाहन चालवण्याचे परवाने मिळाले आहेत. या प्रकारास काही अधिकारीही जबाबदार आहेत. अनेकांना नियमांनुसार वाहनेही चालवता येत नाहीत. त्याने निश्चितच अपघातांची संख्या वाढते. देशभरात सुमारे ५ हजार चालक प्रशिक्षण केंद्रे उघडण्यात येणार आहेत. येथील संगणकीय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच परवाना मिळू शकेल. तीन दिवसांत परिवहन कार्यालयांना संबंधितांना परवाना मंजूर करावा लागेल वा नाकारावा लागेल. तसे न केल्यास दोषींवर कारवाई होईल.
वाहन परवाने देण्याची जागतिक दर्जाची पद्धत लवकरच देशात लागू होईल असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, देशात सध्या वर्षांला ५ लाख अपघात होतात. त्यात ३ लाख नागरिकांना कायमचे अपंगत्व येते, तर सुमारे दीड लाख जण मृत्युमुखी पडतात. नक्षलवादी वा अतिरेकी हल्यात होणाऱ्या मृत्यूहूनही अपघातबळींची संख्या मोठी आहे.